Surprise Me!

मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan

2026-08-16 116 Dailymotion

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटीत होणारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच २७ ऑगस्टला गोदा पट्ट्यातील गावांची बैठक घेऊन स्वयंसेवकांच्या याद्या तयार करण्याचे आवाहन केले.

आंदोलनासाठी पाण्याचे टँकर, अॅम्ब्युलन्स, वाहने, टेंट, टॉयलेट आणि भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आंदोलनानंतर उपलब्ध पुरावे सार्वजनिक करण्याचाही इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. तसेच OBC समाजातील गरीब आणि सामान्य लोकांविरोधात आपली भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, मराठा समाजाच्या मागण्यांना नोंदी आणि गॅझेटच्या आधारे न्याय मिळावा, असे त्यांनी म्हटले. अभ्यासकांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी २९ ऑगस्टपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगितले.

#ManojJarangePatil #MarathaProtest #MarathaAndolan #29August #AntarwaliSarati #MarathaReservation #HyderabadGazette #MaharashtraNews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.